*💫मालवण दि.०२-:* मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील विनायक विष्णू परब उर्फ़ विन्या या नकलाकाराचे जीवन वयाच्या ७० व्या वर्षी वार्धक्यामुळे कठीण झाले आहे. तो आजच्या घडीला उतारवयमुळे तसेच काहीशा आजारामुळे बेजार अवस्थेत जीवन कंठत आहे.या व्यक्तीला आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले होते. वयाच्या दहा ते पंधराव्या वर्षांतच आईवडिलांचे छत्र हरपल्याने खऱ्या अर्थाने विन्या पोरका झाला होता, त्यातच त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागले होते. काही दिवस तो बदलापूर येथील नातेवाईकांच्या कोंबडी पोल्ट्री फार्ममध्ये कामाला होता पण स्वाभिमानी वृत्ती आणि काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडल्याने तो पुन्हा गावी आपल्या घरी आला. नातेवाईकांजवळ आश्रय नघेता भटकत भटकत आपल्या उपजीविकेसाठी देऊळवाडा दत्तवाडी येथील राजाराम बागवे यांच्या घरी दोन वेळच्या जेवणाची सोय झाल्याने तो त्यांच्या घरी रमला त्यातूनच तो प्रामाणिक असल्याने व छोटी छोटी कामे करत त्याचे वास्तव्य बागवे यांच्या घरी वाढू लागले. पण बिघडलेल्या मानसिकतेमुळे व स्वाभिमानी वृत्तीमुळे वेळी अवेळी पुन्हा स्वतःच्या घरी जाणे गावा गावात फिरत राहणे, कगावातील लग्न समारंभांना उपस्थित राहून वरातीमध्ये लाटीकाठी फिरवणे, बारशाच्या कार्यक्रमांमधे जाऊन माईकवर आवर्जून येखादेतरी अंगाई गीत म्हणणे, इतर समारंभात नकला करून किंवा तुटक फुटक बोबडी गाणी गाऊन स्वतःच्या छंदा बरोबर इतरांचे मनोरंजन करणे हा त्याचा नित्यक्रम बनला होता. वीस वर्षांपूर्वी त्याला डोळ्याच्या मोतिबिंदूमुळे आलेल्या अंधत्वावर कोणत्याही उपचाराविना मात केली होती या गोष्टीमुळे आंधळा मागतो एक डोळा तर देव देतो दोन डोळे याचा प्रत्यय गावातील लोकांना आला. काही दिवस या गावातील साईप्रसाद बागवे, महेश बागवे यांनी त्याला आधार दिला वेळोवेळी मदातसुद्धा केली. पण आता त्याचे जीवन वार्धक्क्यामुळे कठीण झाले होते अशावेळी त्याने आपले जुने घर गाठले पण त्याचे जवळचे नातेवाईक कोणी नसल्याने त्याच्या स्वच्छतेचा म्हणजेच आंघोळपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचे दूरचे नातेवाईक सुधाकर परब यांनी त्याच्या पुढील सुरक्षिततेसाठी आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. संतोष अपराज यांनी या कमी प्रयत्न करताना पणदूर येथील जीवन आनंद संस्था सविता आश्रमचे संस्थापक संदीप परब यांच्याशी संपर्क केला. संस्थेचे संदीप परब, व्यवस्थापक देऊ सावंत, आणि त्याचे सहकारी विजय नाईक हे रुग्णवाहिकेसहित काही तासातच गावात दाखल झाले आणि विनायक परब या वृद्धाला आश्रय देण्यासाठी दूरच्या नातेवाईकांच्या आणि ग्रामस्थांच्या विनावणीने सविता आश्रमात दाखल केले. यावेळी सुधाकर परब, कृष्णा(अशोक)बागवे, सहदेव(बाबू)परब, प्रदीप परब, रमाकांत बागवे, चिंतामणी बागवे, म्हाता परब हे उपस्थित होते. या वेळी संस्था संस्थापक संदीप परब म्हणाले की या आश्रमात शंभर सव्वाशे पेक्षा जास्त निराधार माणसे आहेत. यात एक दोन महिन्याचे बालक असून अंशी वर्षापर्यंतची लोक जीवन जगत आहेत. या लोकांचे जीवन अजूनही सुखकर होण्यासाठी दात्यांकडून मदतीची अपेक्षा आहे आज पर्यंत मी ‘खरातो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ याच प्रार्थनेने प्रेरीत होऊन कार्य करत आहे यात माझ्या कुटुंबियांची मोठी साथ आहे, माझ्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास मला वेळ कमी पडतो असे ते या वेळी म्हणाले.
मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील विन्या या नकलाकाराचे जीवन वार्धक्यामुळे कठीण
