विक्रांत सावंत: राजकारणाकडे मी पैसा कमावण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही…
⚡सावंतवाडी ता.०४-:
“आमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे
कार्यरत आहेत. त्या वारशाला पुढे नेण्याचे काम मी करत असून, राजकारणाकडे मी पैसा कमावण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत यांनी आज केले.
ते पुढे म्हणाले की, “मी निवडणुकीच्या मैदानात पारदर्शक आणि स्वच्छ राजकारणाचा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी उतरलो आहे. काळे धंदे, गैरमार्ग किंवा पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा माझा विचार नाही. पैशाने नव्हे, तर प्रेमाने माणसे जोडता येतात, हा विश्वास घेऊन मी जनतेमध्ये वावरतो आणि याचाच मला सार्थ अभिमान आहे.”
