⚡सावंतवाडी ता.०४-: माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात सोनुर्ली येथे जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत व पंचायत समिती सदस्य सचिन बिर्जे यांनी झंझावाती प्रचार केला. प्रत्येक घरोघरी प्रचारावर भर देतांना दोघांनाही लोकाचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी झाले होते.
माझगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून शिंदे शिवसेना भाजपा महायुतीमधून विक्रांत सावंत आणि माजगाव पंचायत समितीसाठी सचिन बिर्जे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या मतदारसंघात दोघांनाही जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे तरुण तडफदार आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून दोघांकडे पाहिले जात असून संपूर्ण मतदारसंघात विक्रांत सावंत यांना तसेच माजगाव पंचायत समितीमध्ये श्री विजय यांना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज सुंदर मध्ये विक्रम सावंत यांनी जनजावटी प्रचार केला यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेशमा सावंत माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी तसेच सोनुर्ली सरपंच नारायण इराक उपसरपंच भरत गावकर रमेश गावकर, मिलिंद गावकर, दशरथ गावकर, संतोष ओठवणेकर, विष्णू नाईक सत्यवान नाईक, सत्यवान मसूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रत्येक घरोघरी भेटीगाठी देत दोन्ही उमेदवारांनी मतदान रुपी आशीर्वाद मागितले. प्रत्येक घराघरात दोघांचेही स्वागत करताना उमेदवारांकडून त्यांना भरभरून आशीर्वादाने देण्यात आले.
