शिरवंडे येथे महिला शेतीशाळेचा शुभारंभ

*सुनिल घाडीगावकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

*💫मालवण दि.०२-:* शिरवंडे येथे तालुका कृषि अधिकारी, मालवण यांचे मार्गदर्शनाखाली महिला शेतीशाळेचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य श्री.सुनिल घाडीगावकर यांचे उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतुन बचत गटातील महिलांना चवळी बियाण्याचे वाटप करण्यात आले. कृषि पर्यवेक्षक श्री.सचिन गवंडे यांनी बचत गटातील महिलांना चवळी लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. तसेच टोकन पद्धतीने चवळी लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कृषि सहाय्यक श्री.सुहास इंगळे यांनी शेतीशाळेचे उद्देश विषद केले. तसेच कडधान्यांचे आहारातील महत्व सांगून गावातील जास्तीत जास्त क्षेत्र कडधान्य पिकाखाली आणण्याचे अवाहन केले. कृषि मित्र श्री.लहुराज गावकर यांनी उपस्थित पदाधिकारी तसेच कृषि विभागाचे आभार व्यक्त केले. यावेळी सरपंच श्री.संतोष लाड, ग्रा.पं.सदस्य अपर्णा गावकर, संजना लाड, बचत गट समन्वयक मयुरी गावकर व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page