आंबोली पोलिस पाटलांच्या विरोधात २१ डिसेबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली पोलिस पाटील यांच्या विरोधात २१ डिसेबर रोजी ११ वाजता आंबोली येथील कृष्णा खापरे, लक्ष्मण गावडे, गणपत पाटील, यशवंत सावंत हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन वरील चारही व्यक्तीनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना मंगळवारी दिले आहे. या निवेदनात आंबोली जकातवाडी येथील पेट्रोल पंप समोर कृष्णा पाखरे यांचे राहते घर आहे. या घराकडे राज्य महामार्गा कडून जाणार रस्ता २६ नंबरला नोंद आहे. मात्र, आंबोली पोलिस पाटील व त्यांचे पती यानी जेसीबी लावून येण्या जाण्याचा रस्ता अडविला आहे. वाटेत काटे टाकले आहेत. येथील जमीन प्रश्न सरकारकडे प्रलंबित याबाबत न्यायालयात केस सुरु आहे. तरीही जमीन आपलीच म्हणत पोलिस पाटील पत्नी-पती दादागिरी, धक्काबुक्की करीत व पाळ कोयता घेवून आमच्यावर दहशद निर्माण करीत आहेत.

या संदर्भात आंबोली तलाठी कार्यालयात सुनावणी वेळी प्रतिवादी व्यक्तीनी मारहाण केली होती. याबाबत आंबोली व सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिस पाटील यांना पदावरुन हटवावे. तसेच तक्रारिची दखल न घेणाऱ्या पोलिस कर्मचारी याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचे नमूद केले आहे.

You cannot copy content of this page