घरपट्टीमध्ये समाविष्ठ स्वच्छता कर जनतेकडून वसूल करू नये

*शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांजवळ निवेदनाद्वारे मागणी

*💫कुडाळ दि.०२-:* कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील घरपत्रक उतारा यामध्ये स्वच्छता कर नागरपंचायतीमार्फत समाविष्ठ करण्यात आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आधीच जनता आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहे. त्यामुळे अशा कराच्या सक्तीमुळे जनतेला आर्थिक भुर्दंड पडणार आहे.त्याच प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रत्येक खात्या अंतर्गत स्वच्छता कर जनतेकडून वसूल करण्यात येऊ नयेत,असे निर्देश जाहीर केलेले आहेत. तरी आपण घरपट्टीमध्ये समाविष्ठ केलेला स्वच्छता कर हा जनतेकडून वसूल करू नये अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आज नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी शहर प्रमुख संतोष शिरसाठ,शिवसेना नगरपंचायत गटनेते बाळा वेंगुर्लेकर ,नागेश जळवी ,किरण शिंदे,नितीन सावंत उपस्थित होते

You cannot copy content of this page