१३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात घंटानाद आंदोलन….

आरपीआय जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा इशारा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वेळकाढूधोरण आणि चालढकलपणामुळे १३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला. यादव म्हणाले, लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क कायद्यानुसार नंददिपक अनंत जाधव यांना शासकीय नोकरीपासून वंचित का ठेवले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन सुरू केले होते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रवेशद्वारावर पुन्हा घंटानाद आंदोलन सुरू केले. अखेर पुणे समाजकल्याण आयुक्त प्रविण दराडे यांनी सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांना विचारले की, आपणांस नियुक्तीचे अधिकार असताना श्री. नंददिपक अनंत जाधव यांना नियुक्तीपासून गेले दहा वर्षे वंचित का ठेवले, आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस दि. १४ ऑगस्ट रोजी। ई-मेलवर देऊन दोन दिवसांत खुलासा सादर करण्याची ताकीद देताच ज्या जयंत चाचरकर यांनी दोन वेळा नोकरी मिळणार नाही म्हणून लेखी दिले त्याच जयंत चाचरकर यांनी आपल्या बचावासाठी शासनाची वर्ग ४ ची सफाईगार पदभरतीला बंदी असतानाही, सफाईगार पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचे शासनाचे आदेश असतानाही वर्ग ३ च्या पात्र पदासाठी आवश्यक ते कागदपत्र तपासणी करून घेतले असताना वेंगुर्ला वसतीगृहात वर्ग ४ चे पदावर नियुक्ती आदेश मनमर्जीने अटी शर्ती घालून दिल्या. शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहून रिक्त पदावर नियुक्ती होणे आवश्यक असताना केलेली नियुक्ती ही आम्ही नवबौद्ध घटकातील असल्यामुळेच जाणूनबुजून पूर्वग्रह दूषित ठेवून सफाईगार पदावर पदवीधर जाधवची नियुक्ती केली आहे. म्हणून पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, प्रविण दराडे यांच्या निदर्शनास आणून दिले असतांना पदवीधर असलेल्या नंददीपक अनंत जाधव यांना वर्ग ३ ची विविध पदे रिक्त असताना वर्ग ३ च्या पदावर नियुक्ती देण्याचे अधिकार असताना शासनाकडे मार्गदर्शन मागण्याचे नाटक कशाला, असे समाज कल्याण आयुक्तालयातील उपायुक्त प्रशांत चव्हाण यांनी पाठविलेल्या पत्रावरुन दिसून आले. तरी ११ डिसेंबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाज कल्याण विभाग स्टेट, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याण निरिक्षक, वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक या संवर्गातील मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांवर नियुक्ती न मिळाल्यास दिनांक १३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ढोल ताशा बॅंजो च्या गजरात घंटानाद आंदोलन सुरू करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page