*💫बांदा दि.०२-:* जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे ७ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बांदा पोलिसांनी काल रात्री केली आहे. ही कारवाई जिल्हा वाहूत शाखेचे पोलिस अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वटकर आणि पोलिस कर्मचारी खाडेकर आणी पावससकर यांनी केली आहे.
गोवा बनावटीच्या दारु वाहतूक प्रकरणी एकाला अटक
