*मुख्य गटातून सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता
*💫सावंतवाडी दि.०२-:* मुक्ताई कॅरम व बुदधिबळ कोचिंग ॲकेडमीने आयोजित केलेल्या कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर स्मृती प्रित्यर्थ पहिल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन ब्लिट्ज बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर विजेता ठरला आहे. कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या ऐक्याऐशीव्या जयंती निमित्त जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सुर्यकांत पेडणेकर यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी कोल्हापुरचे आंतरराष्ट्रीय आर्बिटर श्री.भरत चौगुले यांनी मुख्य पंच आणि रत्नागिरीचे श्री.चैतन्य भिडे यांनी सहाय्यक पंच म्हणुन काम पाहीले. मुक्ताई ॲकेडमीचे आश्रयदाते सावंतवाडीतील राजघराण्याचे युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
रविवार दि.29 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सात राउंड खेळवण्यात आले होते. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी इत्यादी सर्वच तालुक्यातुन मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण बासष्ठ स्पर्धकांनी नावनोंदणी केली होती. मुख्य गटात पाच पारितोषिके आणि विदयार्थी गटात दहा, पंधरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन आणि विदयार्थिनी गटात तेरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन अशी एकूण पंधरा रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके ठेवण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात आली. स्पर्धेसाठी मुक्ताई अॅकेडमीच्या संचालिका सौ.स्नेहा पेडणेकर, टेक्निकल पार्टनर श्री.उत्कर्ष लोमटे आणि मिडीया पार्टनर एपीम मालवणी यांचे सहकार्य लाभले. मुख्य गट – प्रथम बाळकृष्ण पेडणेकर, सावंतवाडी रु.500 द्वितीय सुश्रुत नानल, कणकवली रु.400 तृतीय जुई उबाळे, कणकवली रु.300 चौथा प्रणव आघाव, कणकवली रु.200 पाचवा सावळाराम वराडकर, सावंतवाडी रु.100 19 वर्षांखालील मुले – प्रथम जयदीप तायशेटे, कुडाळ रु.100 द्वितीय विवेक चव्हाण, कुडाळ रु.50 15 वर्षांखालील मुले – प्रथम स्वानंद जोशी, कणकवली रु.100 द्वितीय मयुरेश परुळेकर, मालवण रु.50 10 वर्षांखालील मुले – प्रथम रुद्राक्ष राठोड, कणकवली रु.100 द्वितीय विभव राऊळ, सावंतवाडी रु.50 19 वर्षांखालील मुली – प्रथम पल्लवी निरवडेकर ,सावंतवाडी रु.100 द्वितीय घनिष्ठा राणे, सावंतवाडी रु.50 13 वर्षांखालील मुली – प्रथम गायत्री राठोड, कणकवली रु.100 द्वितीय भार्गवी गवस, कणकवली रु.50 लवकरच जिल्ह्यातील विदयार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण आणि सेमिनारचे आयोजन करण्यात येईल. तसेच जिल्हास्तरीय ऑनलाईन आणि ऑफलाईन कॅरम व बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येतील अशी माहिती मुक्ताई अॅकेडमीचे संचालक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी यावेळी दिली आहे.