*बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*💫सावंतवाडी दि.०२-:* महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून घेतलेले कर्ज केंद्र व राज्य शासनाने त्या मायक्रो फायनान्स कंपन्याना देऊन महिलांना कर्ज माफी द्यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना, उद्योगपतींना सरकारने कर्ज माफी दिली आहे. परंतु लॉकडाऊन मुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडल्याने महिला प्रथमच कर्जमाफी देण्याची मागणी करत आहेत. शासनाने याबाबत १४ डिसेंबर पर्यंत योग्य कार्यवाही न केल्यास १५ डिसेंबर रोजी हजारो महिलांचा मोर्चा काढण्याचे नियोजन केले असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या कर्जमाफी साठी १६ जुलै पासून बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला आघाडी कडून संपूर्ण राज्यभरात आंदोलन सुरू असून १५ डिसेंबर रोजी पुणे येथील मोर्चा आंदोलनानंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीवर २१ जानेवारी २०२१ रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.