⚡वेंगुर्ला ता.०६-:
महापरीनिर्वाण दिन हा स्मरणाचा नाही, तर जागृतीचा दिवस आहे . ज्यांनी वंचित, गोरगरीबांना समाजात माणूस म्हणून जगण्याची ओळख दिली , अधिकार दिले, स्वाभिमान दिला, समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची सर्वांनी शक्ती दिली त्यां महामानवाचे विचार समाजास आदर्शवत आहेत. भारताला प्रगतीशील आणि लोकशाहीयुक्त संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समाजास दिशादर्शक असेच आहे, असे बोलताना
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी प्रतिपादन केले. वेंगुर्ला शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिर येथे वेंगुर्ला भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी
सांस्कृतिक वार्तापत्र ” च्या माध्यमातून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मंडळ अध्यक्ष पप्पू परब, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर , मच्छिमार सेलचे वसंत तांडेल, सचिन शेटये , युवराज जाधव, योगेश नाईक, यशस्वी नाईक आदी भाजपा पदाधिकारी तसेच दलित सेवा मंडळ चे कार्यकर्ते सुहास जाधव, प्रेमानंद जाधव, विठ्ठल जाधव, गणपत जाधव, दामोदर जाधव, सुभाष जाधव, तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका वेंगुर्ला चे अध्यक्ष लाडू जाधव,सदस्य पल्लवी मठकर, मैथिली जाधव व इतर सभासद उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे कार्य समाजास दिशादर्शक-:प्रसन्ना देसाई…
