मालवण लायन्स क्लबतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव…

⚡मालवण ता.१३-:
लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांचा मालवण लायन्स क्लब भेट कार्यक्रम दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी लायन्स क्लबतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्ष अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, सौ. विनया चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी अध्यक्षा अनुष्का चव्हाण यांनी प्रास्ताविक करत आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत आतापर्यंत लायन्स क्लबच्या कार्याची उंची आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. सचिव मनाली दळवी यांनी सेक्रेटरी अहवाल तर खजिनदार पूनम चव्हाण यांनी जमा खर्च सादर केला.

यावेळी दै. रत्नागिरी टाइम्सचे मालवण वार्ताहर पत्रकार भूषण मेतर, नृत्य कलाकार व प्रशिक्षक सिद्धेश पालव, मालवण नगरपालिकेचे तांत्रिक कर्मचारी व नाट्यगृहाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडलेले सुभाष कुमठेकर, मालवणी कवी रुझारिओ पिंटो, नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी हंसा वाघेला व पूजा बेग यांचा वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण या लायन्स सदस्यांचाही सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबकडून कुडाळकर हायस्कुलची विद्यार्थिनी दुर्वा गावडे हिला दत्तक घेऊन तिचा सन्मान करण्यात आला. तर अनुष्का चव्हाण यांचा श्री. चिखले यांच्या हस्ते एमजेएफ म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी सुभाष कुमठेकर, भूषण मेतर व रुझारिओ पिंटो यांनी सत्काराबद्दल आभार मानत क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी लायन्स क्लबतर्फे प्रांतपाल वीरेंद्र चिखले यांचा सत्कार करण्यात आला. श्री. चिखले यांनी आपल्या मनोगतातून लायन्स सदस्यांना मार्गदर्शन करत मालवण लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक करत स्थायी उपक्रम राबविण्यात यावेत, असे सांगितले. तसेच अनेक वर्ष लायन्स क्लबमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांचा श्री. चिखले यांनी सन्मान केला.

सूत्रसंचालन उदय घाटवळ आणि सौ. मिताली मोंडकर यांनी केले. आभार पूनम चव्हाण यांनी मानले. यावेळी डॉ. शशिकांत झाट्ये, बाळू अंधारी, उमेश नेरुरकर, गणेश प्रभुलकर, विश्वास गावाकर, उमेश शिरोडकर, मुकेश बावकर, शांती पटेल, राजा शंकरदास, अवधूत चव्हाण, विराज आचरेकर, सचिन शारबिद्रे, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, स्वप्नाली नेरुरकर, मीना घुर्ये, फॅनी फर्नांडिस, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, दिक्षा गावकर, स्नेहा जामसंडेकर, ऋग्वेदा धामापूरकर, सारिका शिंदे आदी व इतर लायन्स सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page