रोटरी क्लबतर्फे कट्टा येथे कष्टकरी महिलांचा सन्मान…

⚡मालवण ता.१३-:
महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवणतर्फे कट्टा, गुरामवाड, नांदोस येथील टोपल्या विणणाऱ्या, मातीकाम करणाऱ्या तसेच फुलांचे हार करून विकणाऱ्या आठ कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.

कट्टा येथे बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी रुपाली परुळेकर, राजश्री कुडाळकर, स्मिता गोठणकर, संगीता माने, वत्सला माने, सुरेखा तांबट, मंगल माने, वैशाली माने या कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. वैशाली माने आणि रुपाली परुळेकर यांनी रोटरीने दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल आभार मानले. तसेच प्रथमच अशाप्रकारे सन्मान झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.

या सर्व महिला कर्तृत्ववान असून प्रपंच चालवितात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जे काही समाधान मिळाले ते अवर्णनीय होते, अशा भावना रोटरी क्लब तर्फे व्यक्त करण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रंजन तांबे, डॉ. लीना लिमये, सुविधा तिनईकर, प्रवीणा शिंदे, रमाकांत वाक्कर, नियोजन करणारे ऋषी पेणकर, शिवानी गाड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page