वेंगुर्ला भाजपामार्फत नवनिर्वाचित सभापतीसह लोकप्रतिनिधिंचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला भाजपामार्फत वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालय येथे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू lउर्फ पप्पू परब, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर,
जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल – साईप्रसाद नाईक – मनवेल फर्नांडीस , राजबा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीने नवनिर्वाचित निवडून आलेले वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे,आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, वायंगणी पं. स. सदस्या शीतल राऊत, नगरपरिषद नगराध्यक्ष व स्थायी समिती सभापती दिलीप गिरप, नगरपालिका पाणीपुरवठा समिती सभापती सुहास गवंडळकर , नगरपालिका सार्वजनिक बांधकाम समिती सभापती प्रणव वायंगणकर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती सचिन शेट्ये, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईणकर ,महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे व उपसभापती रिया केरकर इत्यादीचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा व मंडळ कार्यकारीणी पदाधीकारी आणि सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तविक वसंत तांडेल यांनी व तालुका सरचिटणीस राजबा सावंत यांनी आभार मानले. यावेळी मनीष दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित सर्वांनी शहर व तालुका विकासासाठी तसेच जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रम देऊन सोडवावेत, असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी बोलताना आवाहन केले.

You cannot copy content of this page