वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरातील एका नव युवा व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी जलदगतीने तपास करीत दोन संशयितास ताब्यात घेत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना आज शुक्रवारी वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता कणकवली (मुंबई ) येथील प्रमुख संशयित महिलेस आणखी 2 दिवस पोलीस कोठडी व दुसऱ्या सावंतवाडी येथील पुरुष संशयितास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित युवकाने सुमारे 9 लाख 90 हजार ची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती .
वेंगुर्ला पोलिसांच्या धडक कारवाईबाबत सिंधुदुर्ग जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
वेंगुर्ला शहरातील व्यावसायिक फसवणूक प्रकरणी संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ …
