*💫सिंधूदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना त्यांच्या मागणी नुसार प्राथमिक शिक्षण विभागाने ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण मंगळवारी दिले आहे.शासनाने शिक्षण संबंधी सर्व माहिती ऑनलाईन घेण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी ‘सरल’ प्रणाली ही वेबसाइट विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये शिक्षकांना आपली दैनंदिन माहिती भरावी लागते. विद्यार्थी, शिक्षक व शाळा संबंधी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने सरल प्रणालीवर अपलोड करावी लागते. हे शिक्षक नियमित माहिती भरतात की नाही ? यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी केंद्र प्रमुख यांची असते. परंतु या अत्याधुनिक साधणाचा वापर व्यवस्थित व जलदगतीने करताना काही केंद्र प्रमुख यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना आपल्या केंद्रातील शिक्षकांची मदत घ्यावी लागते. परिपूर्ण ज्ञान नसल्याने शिक्षकांनी ‘एखादी माहिती भरली’ असे सांगितल्यावर विश्वास ठेवावा लागतो. कारण काही केंद्र प्रमुख यांना सरल प्रणाली हाताळता येत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी आढावा घेतल्यावर शिक्षकांनी सांगितलेली टक्केवारी व प्रत्येक्षात सरल प्रणालीवर अपलोड झालेली माहिती यात तफावत असते. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी ऑनलाईन घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरेंसमध्ये ही बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुख यांना याबाबत आपण प्रशिक्षण आयोजित करतो. त्यात सहभाग घेणाऱ्या केंद्र प्रमुख यानी नाव नोंदणी करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांनी प्रशिक्षण घेण्याची इच्छा दर्शविली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी आंबोकर यानी १ डिसेबर रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षण विभागाच्या ई-गव्हनर्स विभागाचे जिल्हा समन्वयक महेश शिंगाडे यानी उपस्थित केंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख यानी स्वतःचा लॅपटॉप आणला होता. त्यात त्यांना सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शाळा याबाबत आवश्यक माहिती कशी भरायची. तसेच शाळा संच मान्यता माहिती कशी भरायची ? याबाबत शिंगाडे यानी मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख जबाबदारी व कर्तव्य याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण
