विद्यार्थी हे ग्रामीण विकासात परिवर्तनाचे वाहक…

एकनाथ तेली:कुणकेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना,विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२५-२६..

⚡देवगड ता.०६-:
शिक्षण विकास मंडळ संचलित श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा स्वागत समारंभ उत्साहात कुणकेश्वर ग्रामपंचायत सभागृह येथे संपन्न झाला.

यावेळी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील मान्यवर, ग्रामस्थ, अधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. समारंभाचे उद्घाटन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष देवगड शिक्षण विकास मंडळ सभापती एकनाथ तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. उद्घाटनानंतर प्रा. मनोहर सुहास तेली यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश, ‘स्वच्छ गाव – स्वच्छ भारत’ ही संकल्पना आणि सात दिवसांच्या उपक्रमांचे स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. पारस जाधव, पर्यवेक्षक प्रा. मिलिंद भिडे, ग्रामसेवक श्री गुणवंत पाटील, तंटामुक्ती समितीच्या उपाध्यक्ष सौ. शुभांगी तेली, तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे NSS कार्यक्रम अधिकारी श्री. महेंद्र कामत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यानंतर उपप्राचार्य डॉ. पारस जाधव यांनी मनोगत व्यक्त करत NSS स्वयंसेवकांनी शिस्त, जबाबदारी आणि समाजसेवेची भावना जोपासावी असे मार्गदर्शन केले. माननीय श्री. एकनाथजी तेली यांनी अध्यक्षीय भाषण करत शिबिराला शुभेच्छा दिल्या व विद्यार्थी हे ग्रामीण विकासात परिवर्तनाचे वाहक ठरावेत असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ. स्नेहल जोईल (सह-कार्यक्रम अधिकारी, NSS) यांनी केले. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे स्वयंसेवकांमध्ये शिबिरासाठी उर्जा आणि सकारात्मकता निर्माण झाली.

You cannot copy content of this page