इंडियन टॅलेंट सर्च लिटल चॅम्प ओलंपियाडमध्ये दिव्य ज्योती प्रशालेचा झेंडा…

⚡बांदा ता.१३-: इंडियन टॅलेंट सर्च तर्फे घेण्यात आलेल्या लिटल चॅम्प ओलंपियाड स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.
यामध्ये सानवी चकोर, वियोना फर्नांडिस, अन्वय माने, आरोही देसाई, हार्दिक पवार,कार्तिक देसाई,शिवाय गावकर, विघ्नराज सावंत, यश्वी गावकर,सारा येडवे यांनी इंग्लिश ओलंपियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण पद मिळवले, तर सानवी चकोर, वियोना फर्नांडिस, विवान गिरप, अन्वय माने,आरोही देसाई,ओवी देसाई,यशवी गावकर, यांनी गणित ओलंपियाड स्पर्धेत स्वर्णपदक पटकावले.
हार्दिक पवार आणि सारा येडवे हे चित्रकला स्पर्धेतील सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. हार्दिक पवार, कार्तिक देसाई, सारा येडवे, शिवाय गावकर, विघ्नराज सावंत,वरुण धुरी यांनी गणित ओलंपियाड मध्ये रौप्य पदक मिळवले तर विवान हा चित्रकलेमध्ये कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशाळेच्या शिक्षिका माधुरी गवस, कविता नाटेकर तसेच राणी सिस्टर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, मॅनेजर फादर लिजो, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो:-
बांदा येथे यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक.

You cannot copy content of this page