कै. शिवाली पडवळ यांच्या स्मरणार्थ बांदा नट वाचनालयाला ५१ हजारांची देणगी…

⚡बांदा ता.१३-: सुरेश दत्ताराम पडवळ (रा. डेगवे) यांनी आपल्या कन्या (कै.) शिवाली सुरेश पडवळ हिच्या स्मरणार्थ बांदा नट वाचनालयाला एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीमुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार असून वाचनालयाच्या विविध उपक्रमांना हातभार लागणार आहे.
सदर रकमेच्या व्याजातून वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी किंवा वाचकांसाठी एखादी स्पर्धा आयोजित करावी, अशी इच्छा श्री. पडवळ यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील वाचनीय स्वरूपाची सुमारे ३६ हजार ७५४ रुपये किमतीची पुस्तके देखील त्यांनी वाचनालयाला देणगी म्हणून दिली आहेत. यावेळी वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अनंत भाटे, अमिता परब आदी उपस्थित होते.
श्री. पडवळ यांच्या या उदार देणगीबद्दल नट वाचनालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून त्यांच्या या उपक्रमामुळे वाचन चळवळीला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page