रस्त्यांवर सापडलेले पाकीट मूळ मालकाला केले परत….

साधना रेगे यांच्या प्रमाणिकपणाची पुन्हा एकदा प्रचिती *💫सावंतवाडी दि.१७-:* येथील मिलाग्रीस हायस्कूल येथील रस्त्यांवर आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाते वेळी सौ. साधना राहुल रेगे याना रस्त्यांवर एक पाकीट पडलेले सापडले होते. या पाकीट मध्ये काही पैसे आणि महत्वाची कागदपत्रे होती. यावेळी पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून साधना रेगे यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधत ते पाकीट प्रामाणिकपणे पुन्हा…

Read More

लोकांची सेवा करणारा पुंडलीक समाजाला दिसेल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक सौ .अर्चना घारे परब यांचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी बाबत कौतुकाचे उद्गार *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची धुरा हातात घेताच पुंडलिक दळवी हे जोमाने कामाला लागले असून, जबाबदारीने काम करत आहेत. आई वडिलांची सेवा करणारा आपण पुंडलिक पहिलाच आहे. परंतु, दिवसरात्र काम करून लोकांची सेवा करणारा हा पुंडलिक आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का…

*जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश *💫सावंतवाडी दि.१७-:* राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का बसला असून सावंतवाडी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कालच आपल्या पदाचा राजीनामा दिलेल्या भाजप पदाधिकारी शफीक आदम खान यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Read More

कुडाळ एसटी व्यवस्थापनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात भाजप उद्या उठवणार आवाज…

भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उद्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांचे आवाहन कुडाळ एसटी व्यवस्थापनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी उद्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात जमावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले आहे. कुडाळ एसटी डेपो मधून मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २० कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले…

Read More

नगराध्यक्ष संजू परब यांच्या कृतीने पुन्हा एकदा दिसले त्यांचे प्राणिमात्रांवरील प्रेम…

*💫सावंतवाडी दि.१६-:* नगराध्यक्ष संजू परब आज सावंतवाडी मोती तलावाकाठी आले असता त्यांनी तळ्यात असणाऱ्या माश्यासाठी बाजारपेठेतून आपल्या मित्रपरिवाराकडून चुरमुरे मागवून घेत, ते चुरमुरे तळ्यातील माशांना टाकत आपले मुक्या प्राण्यांवरील प्रेम दाखवून दिले आहे. नगराध्यक्ष संजू परब वेळोवेळी आपल्या कृतीतून त्यांचे प्राण्यांवर असलेले प्रेम दाखवत असतात. त्यांची पुन्हा एकदा प्रचिती सावंतवाडीतील नागरिकांना आली आहे. यावेळी त्यांच्या…

Read More

पॅनकार्डच्या ठेवीदारांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी

*वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले आवाहन *💫वेंगुर्ला दि.१६-:*  पॅरानामिक ग्रुप ऑफ कंपनीजच्या पॅनकार्ड क्लबने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील नागरीकांची गुंतवणूक किवा ठेवीमधील पैशांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे…

Read More

शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन…

बंदला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचा पाठिंबा, सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे केले आवाहन* 💫सावंतवाडी दि.१६-:* शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर रोजी एक दिवशीय शाळा बंद आंदोलन जाहीर केले असून, या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने अनुदानित/ अंशतः अनुदानित, माध्यमिक,…

Read More

प्रशासनाच्या कार्यपद्धती चा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून निषेध

इळये ग्रामपंचायत विहीर प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी व म्हापसेकर यांच्यात खडाजंगी *💫सिंधूदुर्गनगरी दि.१६-:* देवगड तालुक्यातील इळये ग्राम पंचायतीने विहिरिसाठी झालेल्या खर्चापेक्षा जास्त निधी दिल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, सबंधित ग्राम पंचायत तेवढ्या रक्कमेत काम करून देण्यास तयार असल्याने प्रशासनाने थोडी लवचिकता दाखवावी, अशी भूमिका पूर्ण सभागृहाने घेतली. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत…

Read More

जिल्हा परिषदच्या पहिल्या आठ महिन्यात झालेल्या खर्चाला वित्त समिती सभेत मान्यता

वित्त समितिची मासिक सभां सभापती रविंद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न* *💫सिंधूदुर्गनगरी दि.१६-:* जिल्हा परिषद आपल्या वार्षिक बजेट मधील नोव्हेबर २०२० पर्यंत केवळ २० टक्केच निधी खर्च करु शकली आहे. पहिल्या आठ महिन्यात झालेल्या खर्चाला बुधवारी झालेल्या वित्त समिती सभेत मान्यता घेण्यात आली. वित्त समितिची मासिक सभां बुधवारी सभापती रविंद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी…

Read More

अवैद्य दारू वाहतूकदारांना आयजी देणार सप्राईज भेट….

सावंतवाडी : कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय विलासराव मोहिते यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यास भेट दिली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांविषयी माहिती घेतली. यावेळी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारी अवैद्य दारू वाहतूक रोखण्यासाठी सरप्राईज अशी टीम नियुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. हे सरप्राईज अवैद्य दारू वाहतूकदारांबरोबर पोलिसांना देखील असणार आहे. यावेळी त्यांनी अवैध…

Read More
You cannot copy content of this page