सावंतवाडी : कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय विलासराव मोहिते यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यास भेट दिली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांविषयी माहिती घेतली. यावेळी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारी अवैद्य दारू वाहतूक रोखण्यासाठी सरप्राईज अशी टीम नियुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. हे सरप्राईज अवैद्य दारू वाहतूकदारांबरोबर पोलिसांना देखील असणार आहे. यावेळी त्यांनी अवैध दारू वाहतूक, हल्लेखोरीला चाप लावणार असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी एसपी राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलिस अधिक्षक डॉ.रोहीणी सोळंके, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक उपनिरीक्षक स्वाती यादव आदी उपस्थित होते.
अवैद्य दारू वाहतूकदारांना आयजी देणार सप्राईज भेट….
