*💫कणकवली दि.१६-:* देवगड तालुक्यातील सौंदाळे येथील फिर्यादी भक्ती नार्वेकर यांचे पती भरत नार्वेकर यांना गैरसमजुतीतून दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तेथीलच संतोष यशवंत गुरव , शर्मिला यशवंत गुरव व रेश्मा लक्ष्मण गुरव यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्र . २ आर . बी . रोटे यांनी प्रत्येकी २० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला . अर्जदारांच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले . १ ९ ऑक्टोबर २०२० रोजी रात्रीच्या सुमारास सौंदाळे – हेळदेवाडी येथील भक्ती नार्वेकर यांच्या घरासमोरील पायवाटेवर भक्ती यांचे पती भरत यांनी तसेच दीपक कामतेकर यांनी आरोपी चंद्रकांत यशवंत गुरव याला शिवीगाळ केली , या गैरसमजुतीतून चंद्रकांत व अर्जदार यांनी फिर्यादी आणि तिचे पती यांना दांड्याने जबर मारहाण केली . तसेच दाताने चावून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून विजयदुर्ग पोलीस स्थानकात अर्जदारांसह चंद्रकांत गुरव यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०७ , ३२४ , ३२३ , ५०४ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . याच घटनेबाबत अर्जदारांपैकी रेश्मा लक्ष्मण गुरव हिने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक कामतेकर , भरत नार्वेकर व श्रीकृष्ण नार्वेकर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३ ९ २ , ३५४ , ३२४ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता . याप्रकरणी अर्जदारांना ३ डिसेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली . त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता . सुनावणीदरम्यान परस्पर विरोधी तक्रारी असल्याने व पूर्ववैमनस्य असल्याने अर्जदारांची प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर मुक्तता करताना अशाप्रकारचा गुन्हा परत करू नये , सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये . पोलीस स्थानकात दर सोमवारी १० ते १२ या वेळेत हजेरी लावावी , तपासात सहकार्य करावे , अशा अटी घालण्यात आल्या आहेत .
मारहाणप्रकरणी सौंदाळे येथील दोन महिलांसह तिघांना जामीन
