पालिका प्रशासनाकडून कारवाई : सामान जप्त
*💫सावंतवाडी दि.१६-:* शहरात सकाळी भाजी विक्रेत्यांचा जागेवरून वाद पेटला होता. यावेळी शहरातील सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात अवैधरित्या लावलेल्या स्टॉलवर कारवाई करत सामान जप्त केले. पालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. शहरात अनधिकृतपणे लावलेल्या फळ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.
