जिल्हा परिषदच्या पहिल्या आठ महिन्यात झालेल्या खर्चाला वित्त समिती सभेत मान्यता

वित्त समितिची मासिक सभां सभापती रविंद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१६-:* जिल्हा परिषद आपल्या वार्षिक बजेट मधील नोव्हेबर २०२० पर्यंत केवळ २० टक्केच निधी खर्च करु शकली आहे. पहिल्या आठ महिन्यात झालेल्या खर्चाला बुधवारी झालेल्या वित्त समिती सभेत मान्यता घेण्यात आली. वित्त समितिची मासिक सभां बुधवारी सभापती रविंद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वित्त अधिकारी मदन भीसे, सदस्य संतोष साटविलकर, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, जेरॉन फर्नांडिस, अनघा राणे यांच्यासह अन्य विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. यावेळी सदस्य संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र याला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गणेश राणे यानी मागच्या सभेला उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्राना कंत्राटी वाहन चालक तर ९ प्राथमिक आरोग्य केंद्राना नियमित चालक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यावेळी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला परिचर विषय पुन्हा गाजला. त्या महिला परिचर कर्मचाऱ्यारीला जिल्हा मुख्यालयात तात्पुरते घेण्यात आले असून तीचा पगार प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघतो, असे आरोग्य विभागाने सांगितले. यांवर संजय देसाई यानी तात्पुरते म्हणजे किती कालावधी ? दोन वर्षे, तीन वर्षे, असा प्रश्न केला. अखेर सभां संपल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सभापती दालनात चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

You cannot copy content of this page