ठाकरे सेनेची सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे मागणी: अन्यथा ठाकरे सेना पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार..
⚡सावंतवाडी ता.११-:
शहरातील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दोन दिवस का उलटले? संशयितांना अभय दिल्यानेच त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. तिसऱ्या संशय आरोपी मिलिंद माने यांना अटक दाखवून नंतर मेडिकल का केली नाही असा प्रश्नांचा आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यावर केला तसेच याप्रकरणी पोलिसांनी योग्य तपास करून संशयतांचा अंतरिम अटकपूर्व जामिन रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत जामीन रद्द न झाल्यास जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकेल असा इशारा यावेळी उपस्थित करून देण्यात आला.
सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या माहेरच्यांना न्याय देण्यासाठी सावंतवाडी पोलिसांकडून होणारा हलगर्जिपणा लक्षात घेता तसेच पोलीस तपासात संस्थेत आरोपींना देण्यात येणारा अभय पाहता ठाकरे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांरी कार्यकर्त्यानी प्रिया चव्हाण यांच्या माहेरच्या व्यक्तींसमवेत सावंतवाडी पोलीस ठाण्याला शुक्रवारी धडक दिली यावेळी पदाधिकाऱ्यांच्या रोशाला सावंतवाडी पोलिसांना सामोरे जावे लागले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, देवगड महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर कणकवली महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी दिव्या साळगावकर संजना कोलते भारतीय कासार समीरा शेख चंद्रकांत कासार शब्बीर मणियार गुणाजी गावडे निशांत तोरस्कर आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.