गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारे दोन संशयीत ताब्यात…

⚡बांदा ता.११-: गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात छुप्या पद्धतीने बेकायदेशीर रित्या बांदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत १,४५,६८० ची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाखाची चारचाकी असा एकूण ६,४५,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री ११.४० च्या सुमारास बांदा देऊळवाडी येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची पक्की खबर बांदा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार बांदा पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील, ज्ञानेश्वर हळदे , राजाराम कापसे यांनी सापळा रचला, यावेळी पत्रादेवी येथून बांदा देऊळवाडी येथे येणाऱ्या चारचाकी मारुती सुझुकी बॅलेनो (एम एच 07 ए एस ०१९४) येताना दिसली यावेळी बांदा पोलिसांनी या गाडीला अडवले असता आतील दोन्ही तरुण गाडी टाकून पळण्याच्या प्रयत्न केला. मात्र पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील व हळदे यांनी शिताफीने दोन्ही तरुणाना पकडले. यावेळी गाडीची तपासणी केली असता रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्कीच्या प्रत्येकी ७५० मि.ली. मापाच्या ८५२ बाटल्या (किंमत अंदाजे ₹१,१९,२८०/-) आणि इम्पिरियल ब्ल्यू हँड पिक ग्रेन व्हिस्कीच्या प्रत्येकी २ लिटर मापाच्या ३० बाटल्या (किंमत अंदाजे ₹२६,४००/-) असा एकूण मुद्देमाल आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी सुजल सचिन पवार (२१, रा. तेर्सेबांबर्डे, गवसवाडी, ता. कुडाळ) आणि सुमित विकास कुडाळकर (१९, रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा) या दोन तरुणांना ताब्यात घेतले असून. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पाच लाख रुपयांची चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक गंजेंद्र पालवे, पोलिस सहायक निरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांनी केली
असून अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page