अभिजीत-केतकी सावंतच्या आवाजातील आरती रसिकांच्या भेटीला..
⚡सावंतवाडी ता.११-: गुरूपौर्णिमेच औचित्य साधून संत एकनाथ महाराज रचित ‘श्री दत्त आरती’ नव्यान संगीतबद्ध करण्यात आली. द्रौपदी क्रिएशन्सनं सादर केलेलं हे गीत गुरुवारी रसिकांच्या भेटीस आले. देवदंग आरती संग्रहातील ही पहिली आरती आहे. सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत, गायिका केतकी सावंत यांनी गायलेली ही आरती सर्वांचेच मन जिंकत आहे.
यापूर्वी कोकणावर सुप्रसिद्ध गीत करणारे संगीतकार प्रणय शेट्ये यांची ही संकल्पना आहे. सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत व सिंधुदुर्गची कन्या, गायिका केतकी सावंत यांनी हे गीत गायलं आहे. निर्मिती सोनल तानवडे व संगीत संयोजन सार्थक कल्याणी यांनी केलं आहे. तर सार्थक कल्याणी, ओमकार सावंत, मुक्ती कोयंडे, सर्वेश राऊळ, अमेय नर यांनी या गीताला कोरस दिली. रेकॉर्डिंग स्टुडिओ यशराज स्टुडिओ, रेकॉर्डीस्ट विजय दयाळ, सागर साठे , मिक्सिंग सार्थक कल्याणी, मास्टरींग विजय दयाळ, प्रोजेक्ट असिस्टंट आकाश शर्मा, निखिल पवार, कॅलिग्राफी सोनल तानवडे,आर्टवर्क-मोशन पोस्टर – ॲसिडुअस पिक्चर स्टूडियोचे प्रितम येलकर, दुर्वा येलकर, छायाचित्रण सुयोग हांदे, प्रणित निकम, संकलन प्रणित वणवे यांनी केलं. दरम्यान, सैलेंद्र सुभाष राणे, संजय विरनोडकर, गंधार कुलकर्णी, दिनेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. निर्मिती व्यवस्थापन अंकुश महाजन, पब्लिसिटी हेड निकेत पावसकर, अमेय नर, राजेश देसाई यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. सध्या ही दत्त आरती सोशल मिडियावर व्हारल होत असून रसिकांची भरभरून दाद या गीताला मिळत आहे. द्रौपदी क्रिएशन्सच्या युट्यूब चॅनलवर ही आरती प्रसारीत करण्यात आली आहे.