खेमराज हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिम्मित “संस्कारवाट” हा संस्कार वर्ग कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.१२-: रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या वतीने येथील खेमराज हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिम्मित “संस्कारवाट” हा संस्कार वर्ग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रसाद म्हैसकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
आजच्या आधुनिक जगात मुले मोबाईल म्हणजे आपले जग या भावनेत आहेत त्यातून त्यांनी बाहेर पडून आपल्यावर योग्य संस्कार करून घेतले पाहिजे. आपले जीवन आपण अभिमानाने जगले पाहिजे तसेच आजकाल मुलांना गणिताची भिती वाटते, पण जसे गणितात प्रश्न सोडवतो त्याच प्रमाणे गणित आपल्याला आयुष्यात काही अडचणी आल्यास त्यावर मात कशी करायची हे देखील शिकवते, आपण जे काही वाचतो त्याचे आपण मनन आणि चिंतन केले पाहिजे आपणात बदल घडवायचा असेल तर नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीकोन आचरणात आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले किल्ले तहात देऊन देखील ते हतबल झाले नाहीत तर त्यांनी नव्या जोमाने ते किल्ले परत मिळवले तसेच तुम्ही देखील काही अपयश आल्यास खचून न जाता नव्याने उभारी घ्या असे श्री म्हैसकर म्हणाले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर खेमराज हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदू नाईक, पर्यवेक्षक प्रमोद सावंत, सहशिक्षक सूर्यकांत सांगेलकर, रणवीर रणसिंग, श्री पवार श्री देसाई, रोट्रॅक्टचे अध्यक्ष रोहन कुबडे, सचिव मिताली सावंत, सहसचिव संकेत वेंगुर्लेकर, ओंकार पावसकर, दत्तराज चिंदरकर, मयूर मसुरकर, साहिल बांदेकर, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी कल्याणकर हिने केले तर आभार नेहा निगुडकर हिने मानले.
फोटो:-
बांदा खेमराज हायस्कुल येथे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करताना मुख्याध्यापक नंदू नाईक. सोबत प्रसाद म्हैसकर, रोहन कुबडे, मिताली सावंत व इतर.

You cannot copy content of this page