⚡बांदा ता.११-: रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे यांची, सचिवपदी स्वप्नील धामापूरकर यांची तर खजिनदारपदी सुदन केसरकर यांची निवड झाली झाल्याची माहिती मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ हॉल, दोडामार्ग रोड, बांदा येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून अमित माटे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बांदा चे एजी डॉ. विनया बाड, डॉ. विद्याधर तायशेटे, राजेश घाटवळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रोटरी पदाधिकारी व रोटरी सदस्य हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
समाजातील गरजू आणि वंचितांसाठी रोटरी क्लब ऑफ बांदा नेहमीच सहकार्याची भावना जपत समाजोपयोगी कार्य करीत राहील. या कार्यात सर्व बांदावासियांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
फोटो:-
पासपोर्ट
रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे यांची निवड…
