⚡बांदा ता.११-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पीएम श्री बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थीनी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७२ गुण प्राप्त करून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
फेब्रुवारी२०२५मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये बांदा केंद्र शाळेतील दुर्वा नाटेकर बरोबर स्वरा दिपक बांदेकर व तन्वी यशवंत साईल या दोन्ही विद्यार्थ्यांनींनी जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान मिळवले याच बरोबर शाळेतील विद्यार्थी स्वामिनी लक्ष्मण तर्पे, अंकीता शाहू झोळ,आफरीन अनिश शहा, अवनिश आशिष कुबडे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषी स्वागत करण्यात आले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सदस्या रूपाली शिरसाट, मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी अभिनंदन केले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षक उदय सावळ रंगनाथ परब जे.डी.पाटील, स्नेहा घाडी, जागृती धुरी ,मनिषा मोरे ,कृपा कांबळे, प्रसन्न जित ,सुप्रिया धामापूरकर यांचें मार्गदर्शन लाभले आहे,शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कळमकर गटशिक्षणाधिकारी परब, विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर यांनी शाळेचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
[ दुर्वा नाटेकर ठरली २९००रूपयांच्या बक्षीसाची मानकरी–
पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री जे.डी पाटील यांनी बांदा केंद्र शाळेतील पाचवीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर २६८गुण मिळवले तर २५००रूपये (यापूर्वी विद्यार्थीनी कनिष्का केणी हिने २६६गुण मिळवलेत) व पुढील दोन गुणांसाठी २००रूपये या प्रमाणे विद्यार्थ्यांना बक्षीस पुरस्कृत केले आहे चालू वर्षी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७२गुण मिळविल्याबद्दल अंतिम निकाल जाहीर झालेल्या दिवशी रोख २९००रूपयाचे बक्षीस देऊन दुर्वाला सन्मानित केले.]