*💫सावंतवाडी दि.१६-:* नगराध्यक्ष संजू परब आज सावंतवाडी मोती तलावाकाठी आले असता त्यांनी तळ्यात असणाऱ्या माश्यासाठी बाजारपेठेतून आपल्या मित्रपरिवाराकडून चुरमुरे मागवून घेत, ते चुरमुरे तळ्यातील माशांना टाकत आपले मुक्या प्राण्यांवरील प्रेम दाखवून दिले आहे. नगराध्यक्ष संजू परब वेळोवेळी आपल्या कृतीतून त्यांचे प्राण्यांवर असलेले प्रेम दाखवत असतात. त्यांची पुन्हा एकदा प्रचिती सावंतवाडीतील नागरिकांना आली आहे. यावेळी त्यांच्या सोबत बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे उपसरपंच विनोद राऊळ, मकरंद तोरसकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष संजू परब यांच्या कृतीने पुन्हा एकदा दिसले त्यांचे प्राणिमात्रांवरील प्रेम…
