कुडाळ एसटी व्यवस्थापनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात भाजप उद्या उठवणार आवाज…

भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उद्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांचे आवाहन

कुडाळ एसटी व्यवस्थापनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी उद्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात जमावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले आहे. कुडाळ एसटी डेपो मधून मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २० कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे हाल असताना, त्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम एसटीचे क्रूर धोरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. केवळ वरिष्ठांच्या हुजरेगिरीपोटी स्थानिक फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडवले जात असून, एसटीच्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळले जात असून, हा डाव मोडून काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी १०:३० वाजता कुडाळ भाजप कार्यालयात एकत्र येण्याचे आवाहन रणजित देसाई यांच्यकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page