*वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले आवाहन
*💫वेंगुर्ला दि.१६-:* पॅरानामिक ग्रुप ऑफ कंपनीजच्या पॅनकार्ड क्लबने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील नागरीकांची गुंतवणूक किवा ठेवीमधील पैशांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले आहे.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरु असून पुण्यातील पॅनकार्ड क्लब कंपनीचे गुंतवणूकदार किंवा ठेवीदार हे संपूर्ण सिधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असल्याचे तपासात दिसून आहे. तरी सर्व प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पॅनकार्ड क्लब कंपनीचे गुंतवणूकदार किंवा ठेवीदार यांना त्यांच्याकडील कागदपत्रांसह सोबतच्या विहित नमुन्यातील फॉर्मप्रमाणे माहिती भरुन पोलिस ठाण्यात जमा करावे.
