लोकांची सेवा करणारा पुंडलीक समाजाला दिसेल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक सौ .अर्चना घारे परब यांचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी बाबत कौतुकाचे उद्गार

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची धुरा हातात घेताच पुंडलिक दळवी हे जोमाने कामाला लागले असून, जबाबदारीने काम करत आहेत. आई वडिलांची सेवा करणारा आपण पुंडलिक पहिलाच आहे. परंतु, दिवसरात्र काम करून लोकांची सेवा करणारा हा पुंडलिक आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक अर्चना घारे परब यांनी पुंडलिक दळवी यांचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी खुप मेहनत घेतली असून, त्यांच्या कार्याने येणाऱ्या काळात गावा गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मनापासून काम करणारी अशी संघटना व कार्यकर्ते असतील तर येणाऱ्या काळात नक्कीच राष्ट्रवादी कॉंग्रेस हा १ नंबरचा पक्ष असेल असा विश्वास देखील त्यानी आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी व्यक्त केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी महिलानी मोठ्या प्रमाणात प्रवेश केल्याने त्यांचे कौतुक देखील केले आहे.

You cannot copy content of this page