रस्त्यांवर सापडलेले पाकीट मूळ मालकाला केले परत….

साधना रेगे यांच्या प्रमाणिकपणाची पुन्हा एकदा प्रचिती

*💫सावंतवाडी दि.१७-:* येथील मिलाग्रीस हायस्कूल येथील रस्त्यांवर आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाते वेळी सौ. साधना राहुल रेगे याना रस्त्यांवर एक पाकीट पडलेले सापडले होते. या पाकीट मध्ये काही पैसे आणि महत्वाची कागदपत्रे होती. यावेळी पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून साधना रेगे यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधत ते पाकीट प्रामाणिकपणे पुन्हा त्यांच्या स्वाधीन केले आहे. या आधी देखील साधना रेगे यांनी त्यांना सापडलेले मौल्यवान वस्तू त्यांच्या मुळ मालकाला परत केली होती. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page