मारहाणप्रकरणी सौंदाळे येथील दोन महिलांसह तिघांना जामीन

*💫कणकवली दि.१६-:* देवगड तालुक्यातील सौंदाळे येथील फिर्यादी भक्ती नार्वेकर यांचे पती भरत नार्वेकर यांना गैरसमजुतीतून दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तेथीलच संतोष यशवंत गुरव , शर्मिला यशवंत गुरव व रेश्मा लक्ष्मण गुरव यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्र . २ आर . बी . रोटे यांनी प्रत्येकी २० हजार रुपयांचा सशर्थ…

Read More

सावंतवाडी शहरातील सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई

पालिका प्रशासनाकडून कारवाई : सामान जप्त *💫सावंतवाडी दि.१६-:* शहरात सकाळी भाजी विक्रेत्यांचा जागेवरून वाद पेटला होता. यावेळी शहरातील सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात अवैधरित्या लावलेल्या स्टॉलवर कारवाई करत सामान जप्त केले. पालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. शहरात अनधिकृतपणे लावलेल्या फळ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.

Read More

मनसे व शिवप्रेमी ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना पकडले

कुडाळच्या आठवडा बाजारात घडली घटना *💫कुडाळ दि.१६-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवप्रेमी ग्रुप कुडाळ यांच्या कार्यकर्त्यांनी आज आठवडा बाजार दिवशी चरस गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कुडाळचे मनसेचे शहर सचिव रमा नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार कुडाळमध्ये पाटील व ताबीश नाईक हे व्यक्ती आठवडा बाजार दिवशी चरस गांजा…

Read More

पत्रादेवी चेकपोस्टवर सव्वा तीन लाखांची दारु पकडली

*💫बांदा दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात पत्रादेवी एक्साइज चेकपोस्टवर अबकारी खात्याने कारवाई केली. या कारवाईत ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुसह १ लाख ८० हजारांचा टेम्पो असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गिरीश डी. जोशी (४५, रा. ठाणे)…

Read More

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी व नववी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

*प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना *💫सावंतवाडी दि.१६-:* मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यलायल समिती नॉयडाद्वारा प्राप्त झाली असून प्रवेशाची सर्व माहिती https://navodaya….

Read More

भाजी विक्रेत्यावरुन पुन्हा वाद चिघळणार..

मार्गशीष सणानिमित्त बाहेर बसलेल्या विक्रेत्यावर उगारले कारवाईचे हत्यार.. सावंतवाडी येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या वरून पुन्हा एकदा पालिका प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मार्गशीष दिनानिमित्त महिला व्यापाऱ्यांनी बाहेर लावलेल्या दुकानावर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याने महिला विक्रेत्या संतप्त झाल्या स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला दरम्यान…

Read More

नांदगाव येथे हायवे व ठेकेदार कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू.

*💫कणकवली दि.१६-:* हायवेच्या जवळच घर असल्याने कंपनीने उत्खनन करून माती काढल्याने झाडे कोसळून घरालाही धोका निर्माण झाला असून याबाबत वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी करूनही कोणीच दखल न घेतल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून नांदगाव तिठा येथील रोहन नलावडे कुटूंबिय या ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सूरू केले आहे . दरम्यान या नांदगाव येथील उपोषण…

Read More

आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ मालवण तालुक्यातील नवीन तीन पुलांची कामे मंजूर

*नाबार्ड योजनेअंतर्गत निधीची तरतूद *💫कुडाळ दि.१६-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाकरिता कुडाळ तालुक्यातील मांडकुली भुईवाडी तेरसे बांबर्डे माळवाडी रस्ता ग्रा. मा. ४३० मध्ये किमी. ०/३०० मध्ये मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुकयातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता ग्रा. मा. ३८० वर किमी ०/९०० मध्ये…

Read More

माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिरापासूनच्या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *💫सावंतवाडी दि.१६-:* माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिर ते उभाबाजार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा या मागणीला माठेवाडा येथील नागरिकांना यश आले असून, नगराध्यक्ष संजू परब यांनी या रस्त्याचा शुभारंभ केला आहे. या रस्त्यांवर खड्डे पडल्याने हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत होता. यावेळी नगरसेवक…

Read More

युवासेना सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिरात १०३ जणांनी केले रक्तदान

कणकवली विधानसभा मतदारसंघात नांदगाव येथे उपक्रम *💫कणकवली दि.१६-:* युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कै.देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शाखा नांदगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री…

Read More
You cannot copy content of this page