*प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना
*💫सावंतवाडी दि.१६-:* मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यलायल समिती नॉयडाद्वारा प्राप्त झाली असून प्रवेशाची सर्व माहिती https://navodaya. gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज नि: शुल्क आॅनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरताना पालकांची व विद्यार्थ्यांची सई व फोटो आवश्यक आहे. इयत्ता सहावीसाठी निवड चाचणीत प्रवेश परीक्षेत बसणारा विद्यार्थी सलग तिसरी व चौथी पास असावा व पाचवीमध्ये संपूर्ण वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिकणारा असावा. त्याचा जन्म १ मे २००८ ते ३० एप्रिल २०१२ पर्यंतचा असावा व त्याने १५ सप्टेंबर २०२० पूर्वी पाचवीमध्ये प्रवेश घेतलेला असावा, अन्यथा प्रवेश अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची अंतीम तारीख १५ डिसेंबरपर्यंत होती, ती वाढवून २९ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावयाचे आहेत. इयत्ता सहावीसाठीची परीक्षा १० एप्रिल २०२१ रोजी व इयत्ता नववीसाठीची परीक्षा १३ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. इतर मागास (ओबीसी) प्रवर्गात अर्ज भरणाºया विद्यार्थ्यांनी मार्च २०२१ पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्रीजीतबाबू नयना, परीक्षाप्रमुख जे. बी. पाटील व एस. पी. हिरेमठ यांनी केले आहे.
