भाजी विक्रेत्यावरुन पुन्हा वाद चिघळणार..

मार्गशीष सणानिमित्त बाहेर बसलेल्या विक्रेत्यावर उगारले कारवाईचे हत्यार..

सावंतवाडी येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या वरून पुन्हा एकदा पालिका प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मार्गशीष दिनानिमित्त महिला व्यापाऱ्यांनी बाहेर लावलेल्या दुकानावर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याने महिला विक्रेत्या संतप्त झाल्या स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला दरम्यान दुकाने लावण्यास मुभा द्या अशी मागणी घेऊन गेलेल्या विक्रेत्यांची चर्चा करण्याचे नगराध्यक्ष संजू परब त्यामुळे संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी दुकाने लावणारच अशी ठाम भूमिका घेतली. संत गाडगेबाबा भाजी मंडई मध्ये भाजी विक्री करणाऱ्या महिलांनी आज सकाळी मंडई बाहेर आपली दुकाने थाटली त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचे हत्यार उगारले मात्र कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सामोरे जाताना महिला विक्रेत्यांनी आधी परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई करा शहर सोडून जायचं कुठे आमच्यावरच अन्याय का गेली कित्येक वर्ष आम्ही याठिकाणी व्यवसाय करतो मात्र अशी वेळ कधी आली नव्हती अशा प्रश्नांचा भडीमार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनीही व्यापाऱ्यांची बाजू घेत त्या ठिकाणी धाव घेतली मात्र आम्हाला या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही आहे आम्ही आमचे काहीतरी बघतो असे सांगत सर्व महिला विक्रेत्यांनी पालिका कार्यालय गाठले त्या ठिकाणी नगराध्यक्ष संजू परब त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता उपस्थित पत्रकारांना पाहताच नगराध्यक्ष यांनी त्यांच्या करण्याचे सोडून तुम्ही उद्या या असे सांगत चर्चा नाकारली त्यामुळे संतप्त झालेल्या महिला विक्रेत्यांनी दुकाने लावणारच असे म्हणून पुन्हा एकदा आपली दुकाने थाटली

You cannot copy content of this page