Headlines

बांदा पोलिस ठाण्याचा कार्यभार शामराव काळे यांनी स्वीकारला

*⚡बांदा दि.३१-:* बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाल्याने आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी बांदा पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. निरीक्षक काळे हे मूळ इगतपुरी येथील असून त्यांनी आतापर्यंत गडचिरोली, मुंबई येथे सेवा बजावली आहे. बांद्यात ग्रामस्थांच्या सहकार्याने कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निरीक्षक काळे…

Read More

प्रत्येक विभागाने ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती करावी  – दादासाहेब गिते

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केली.*             येथील परिषद सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे बैठक आज झाली. याबैठकीला पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, नंदकिशोर करवडे, बीएसएनएलचे आरविंद…

Read More

जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981जणांनी घेतला पहिला डोस  

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.  यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 728  जणांनी दुसरा डोस घेतला.  9  हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 623 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 1 हजार 528 व्यक्तींनी पहिला डोस तर 61 हजार 810 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 10 हजार 744 नागरिकांनी पहिला डोस तर 61 हजार 699 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.  18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 17 हजार 964 जणांनी पहिला डोस तर 17 हजार 428 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे….

Read More

गोवा बनावट दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

ट्रकसह २५ लाखाचा मुद्देमाल जप्त *⚡दोडामार्ग ता.३१ सुमित दळवी-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चोरट्या दारुच्या विरोधात चालू केलेल्या मोहीमेला दोडामार्ग पोलिसांना मोठे यश आले आहे.एक ट्रक भरलेली गोवा बनावटीची दारू पोलीसांनी या धडक मोहिमेत जप्त केली.ट्रकसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची रक्कम २५ लाख रुपये असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यामध्ये दोघाजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. विजघर…

Read More

वरवडे तलाठी निलिमा सावंत यांचा बढतीनिमित्त निरोप समारंभ

तलाठी नीलिमा सावंत यांच्यासारखे लोकाभिमुख काम अपेक्षित:सोनू सावंत *⚡कणकवली ता.३१-:* सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या तसेच कोरोणा काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वरवडे तलाठी नीलिमा सावंत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तलाठी कार्यालयात आलेला कुणीही त्यांच्या कारकिर्दीत काम झाल्याविना गेला नाही असे कधीच झाले नाही. गाव पातळीवर असे लोकाभिमुख काम झाले तर सर्वसामान्यांचे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा पर्यटन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी श्री.दामोदर तोडणकर यांची निवड

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या बैठकीत निर्णय *⚡मालवण ता.३१-:* गेले दीड दोन वर्षे कोरोनामुळे मालवण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय डबघाईस आला असल्याने पर्यटन उद्योग व इतर व्यवसायांना उर्जितावस्था आणण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने ठोस पावले उचलली आहेत त्याचा एक भाग म्हणून मालवण शहराचा पर्यटन विकास आराखडा तयार करून तो मालवण नगरपालिकेला तसेच शासनाला सादर…

Read More

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा सत्कार

आम्ही कणकवलीकरच्यावतीने कोरोना व पूरस्थितीत चांगल्या कामाबद्दल दखल *⚡कणकवली ता.३१-:* गेल्या वर्षभरापासून अधिक कोरोना काळात तसेच महामार्ग चौपदरीकरण, पूरस्थिती यामध्ये चांगले काम केल्याबद्दल आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी तहसीलदार आर.जे. पवार, दीपक बेलवलकर नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉक्टर…

Read More

कणकवली पोलीस निरीक्षकपदी सचिन आनंदराव हुंदळेकर यांची नियुक्ती

*⚡कणकवली ता.३१-:* जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षकपदापर्यंतच्या बदलीचे आदेश काल सायंकाळी उशिरा निर्गमित केले असून अजमुद्दीन मुल्ला यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर कणकवली पोलीस निरीक्षपदी तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेले पी आय विजय यादव यांची आर्थिक गुन्हे शाखा पदी बदली झाली आहे.कणकवली पोलीस निरीक्षकपदी सावंतवाडी…

Read More

गणेशोत्सव नियोजनासाठी २ सप्टेंबर रोजी बैठक

गणेश विसर्जनासाठी चार बोट असणार उपलब्ध – नगराध्यक्ष संजू परब *⚡सावंतवाडी ता.३१-:* गणेश चतुर्थी काही दिवसांवर आल्याने त्याच पार्श्वभूमीवर २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिका येथील लोकमान्य टिळक सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी केले आहे. यावेळी ते…

Read More

खारेपाटण – बोरिवली एस.टी. १५ सप्टेंबपासून सुरू करणार

खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या मागणीला यश *⚡कणकवली ता.३१-:* गेली १० वर्षांपेक्षा अधिक काळ बंद असणारी खारेपाटण एस टी बसस्थानकातून मुंबईला जणारी खारेपाटण ही गाडी आता पुन्हा एकदा नव्याने १५ सप्टेंबर २०२१ खारेपाटण – बोरिवली प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी एस.टी. विभागीय अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर दिली. खारेपाटण…

Read More
You cannot copy content of this page