गोवा बनावट दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

ट्रकसह २५ लाखाचा मुद्देमाल जप्त

*⚡दोडामार्ग ता.३१ सुमित दळवी-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चोरट्या दारुच्या विरोधात चालू केलेल्या मोहीमेला दोडामार्ग पोलिसांना मोठे यश आले आहे.एक ट्रक भरलेली गोवा बनावटीची दारू पोलीसांनी या धडक मोहिमेत जप्त केली.ट्रकसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची रक्कम २५ लाख रुपये असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यामध्ये दोघाजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. विजघर नाक्यावर ही कारवाई करण्यात आली.पोलीस निरीक्षक आर.जी.नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग,कुलदीप पाटील यांनी ही धडक कारवाई केली.

You cannot copy content of this page