वरवडे तलाठी निलिमा सावंत यांचा बढतीनिमित्त निरोप समारंभ

तलाठी नीलिमा सावंत यांच्यासारखे लोकाभिमुख काम अपेक्षित:सोनू सावंत

*⚡कणकवली ता.३१-:* सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या तसेच कोरोणा काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वरवडे तलाठी नीलिमा सावंत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तलाठी कार्यालयात आलेला कुणीही त्यांच्या कारकिर्दीत काम झाल्याविना गेला नाही असे कधीच झाले नाही. गाव पातळीवर असे लोकाभिमुख काम झाले तर सर्वसामान्यांचे प्रश्न सहजरित्या सोडविणे शक्य होईल, असे प्रतिपादन भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांनी केले. वरवडे गावच्या तलाठी नीलिमा सावंत यांची बढतीपर ओरोस भूसंपादन विभागात बदली झाली. यानिमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा छोटेखाणी निरोप समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरवडे पं.स. सदस्य राधिका सावंत यांच्या हस्ते श्रीमती सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रा.पं.सदस्य सिरील फर्नाडिस, अमोल बोन्द्रे, प्रदीप घाडीगांवकर, प्रमोद गावडे, सारिका लाड, स्वप्नाली सावंत, दिपाली सावंत, सदा चव्हाण, ग्रामसेवक पावसकर, बबन घाडीगांवकर, विनायक वरवडेकर, मंगेश घाडीगांवकर, पोलीस पाटील सावंत, सलाउद्दिन कुडाळकर ,संतोष चव्हाण, सादिक कुडाळकर, पी. टी. परब, मधुकर परब, हेमंत परब, अशोक परब,अंजली आरोस्कर, दशरथ घाडीगांवकर, विजय कदम, हनुमंत बोन्द्रे, पपु पुजारे, सूर्यकांत मेस्त्री , बाळा मेस्त्री , संदिप मेस्त्री,प्रकाश परब,राजेश कोदे, प्रशांत घाडीगांवकर,आदी वरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. श्रीमती सावंत यांनी त्यांच्या वरवडे गावातील तलाठी पदाच्या कारकिर्दीत केलेल्या सेवेबद्दल सर्वांनीच गौरवोद्गार काढले. तसेच त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page