जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981जणांनी घेतला पहिला डोस  

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.  यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 728  जणांनी दुसरा डोस घेतला.  9  हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 623 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 1 हजार 528 व्यक्तींनी पहिला डोस तर 61 हजार 810 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 10 हजार 744 नागरिकांनी पहिला डोस तर 61 हजार 699 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.  18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 17 हजार 964 जणांनी पहिला डोस तर 17 हजार 428 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 5 लाख 6 हजार 269 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.  जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4  लाख 77 हजार 800  लसी  प्राप्त  झाल्या  असून त्यामध्ये  3 लाख 45 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 32 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 3 लाख 71 हजार 29 कोविशिल्ड आणि 1 लाख 35  हजार 240  कोवॅक्सिन असे मिळून 5 लाख 6 हजार 269 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 7 हजार 230 लसी उपलब्ध असून त्यापैकी 6 हजार 770 कोविशिल्डच्या आणि  460 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 660 लसी शिल्लक असून त्यापैकी 390  कोविशिल्ड आणि 270 कोवॅक्सीनच्या लसी  शिल्लक आहेत.

You cannot copy content of this page