*⚡बांदा दि.३१-:* बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाल्याने आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी बांदा पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. निरीक्षक काळे हे मूळ इगतपुरी येथील असून त्यांनी आतापर्यंत गडचिरोली, मुंबई येथे सेवा बजावली आहे. बांद्यात ग्रामस्थांच्या सहकार्याने कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निरीक्षक काळे यांनी सांगितले.
बांदा पोलिस ठाण्याचा कार्यभार शामराव काळे यांनी स्वीकारला
