जयेश परब याची राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

*⚡वेंगुर्ला ता.३१-:* राजस्थान नोखा-बिकानेर येथे २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणा-या ३४व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ल्याचा खेळाडू जयेश राजन परब याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कोरोना परिस्थीती लक्षात घेता राज्यस्तरीय स्पर्धेला परवानगी न मिळाल्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघाची निवड आभासी पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघाच्यावतीने जयेश परब याची निवड झाली. जयेश परब याने यापूर्वी शरीरसौष्ठवमध्ये ‘खर्डेकर श्री‘ हा मनाचा किताब पटकावत अनेक स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले आहे. राज्य कबड्डी पंच, तसेच उत्कृष्ट समालोचक म्हणून त्याने यशही मिळवले आहे. जयेश यांस रस्सीखेच खेळाचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू किशोर सोनसुरकर, आंतराष्ट्रीय राष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू हेमंत चव्हाण, राज्य खेळाडू भूषण मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव तथा महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशन अध्यक्षा माधवी पाटील, सचिव जनार्दन गुपिले, सिंधुदुर्ग रस्सीखेच संघ अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव किशोर सोनसुरकर, अमोल तांडेल, निलेश चमणकर, हेमंत गावडे, हेमंत नाईक, मनोहर कावले, प्रसाद गावडे, त्रिबक आजगावकर, रुपेश मोर्जे, व्यायामशाळा संचालिक अबोली सोनसुरकर, हेमंत चव्हाण, सोनाली मुंडये, भूषण मसुरकर यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page