सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने महावितरणकडे मागणी
*⚡सावंतवाडी ता.३१-:* येथील तालुक्यातील अनेक थकीत ग्राहक असतील मात्र या ग्राहकांची गणेशोत्सव कालावधीत कनेक्शन तोडू नयेत तसेच बिलाच्या पैशाची सक्ती करू नये अशी मागणी सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने येथील विद्युत महावितरणचे भुरे व बागलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर याला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिउत्तर देण्यात आले असून ग्राहकांनी टप्प्याटप्याने थकीत बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,सत्यजित धारणकर, रणजीत सावंत,आदी उपस्थित होते.
