गणेशोत्सव नियोजनासाठी २ सप्टेंबर रोजी बैठक

गणेश विसर्जनासाठी चार बोट असणार उपलब्ध – नगराध्यक्ष संजू परब

*⚡सावंतवाडी ता.३१-:* गणेश चतुर्थी काही दिवसांवर आल्याने त्याच पार्श्वभूमीवर २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिका येथील लोकमान्य टिळक सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी केले आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, गणेश चतुर्थीच्या वेळी मोती तलाव मध्ये गणेश मूर्ती विसर्जन करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी नगरपालिकेमार्फत तीन लहान तर एक मोठी बोट खरेदी करण्यात आली असून, गार्डन, पॉम्पस हॉटेल आणि माने सुपर बाजार समोर या तीन ठिकाणी बोट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच गणेश चतुर्थी नंतर पर्यटनासाठी या बोटींचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सावंतवाडी शहरात प्रथमच मोती तलाव मध्ये आधुनिक बोटींचा उपयोग गणेश विसर्जनासाठी करण्यात येणार आहे. अशी माहिती दिली आहे.

You cannot copy content of this page