प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा सत्कार

आम्ही कणकवलीकरच्यावतीने कोरोना व पूरस्थितीत चांगल्या कामाबद्दल दखल

*⚡कणकवली ता.३१-:* गेल्या वर्षभरापासून अधिक कोरोना काळात तसेच महामार्ग चौपदरीकरण, पूरस्थिती यामध्ये चांगले काम केल्याबद्दल आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी तहसीलदार आर.जे. पवार, दीपक बेलवलकर नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉक्टर विद्याधर तायशेटे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉक्टर सुहास पावसकर, दादा कुडतरकर, मेघा गांगण, हेमंत सावंत, डॉक्टर हर्षद पटेल, बाळू मेस्त्री, राजेश राजाध्यक्ष, विजय गावकर, संदीप राणे, विनोद दळवी आदी उपस्थित होते. सौ. राजमाने यांनी गेल्या वर्षभरात अधिकच्या कोरॉना स्थितीत केलेले उत्कृष्ट काम, महामार्ग चौपदरीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी घेतलेली मेहनत, चक्रीवादळ व पूर्वस्थितीत केलेल्या कामाबद्दल वाढदिवसाचे औचित्य साधून हा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page