Headlines

शासकीय मेडिकल कॉलेज मंजुरीचे आदेश रद्द म्हणजे सिंधुदुर्गचे दुर्दैव:परशुराम उपरकर

नॅशनल मेडिकल कमिशनचा संशयास्पद कारभार; श्रेयवादात विकासाला खीळ *⚡कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या मेडिकल कॉलेजचे मंजुरी आदेश अगदी ४८ तासात रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन कडून आलेत. परंतु याच कमिशनने कॉलेजची पाहणी करून कॉलेजला मंजुरी दिल्यानंतर पुन्हा कॉलेजचे मंजुरी आदेश रद्द करणे, हे खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुर्दैव आहे. जी कमिटी स्वतः…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ९६४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

फोंडाघाट नवी कुर्ली वसाहत येथे ई पीक पाहणीबाबत मार्गदर्शन

राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पुढाकार *⚡कणकवली ता.२३-:* राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल अॅपदवारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रांसह शेतकऱ्यांनी अपलोड करावीत .या संदर्भातील माहिती देण्यासाठी फोंडाघाट नवी कुर्ली वसाहत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी तहसीलदार आर.जे.पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ…

Read More

जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५ टक्के लाभांशची शिफारस

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡ओरोस ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या ११७७ सभासद संस्थांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे तशी शिफारस संचालक मंडळाने केली असून २९ सप्टेंबर च्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने हा लाभांश सभासद संस्थांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मार्च…

Read More

पाडलोसमध्ये ई-पीक पाहणी नोंदणीस प्रारंभ

*⚡बांदा दि.२३-:* ई-पीक नोंदणीचे फायदे शेतकऱ्यांना भविष्यात अनेक आहेत. नैसर्गिक आपत्ती, पिक कर्ज, विमा आदी लाभ घेण्यासाठी शासनाकडे या नोंदीमुऴे खातेनिहाय व पीकनिहाय डाटा उपलब्ध होणार आहे. नुकसान टाळण्यासाठी खातेदारांनी दिलेल्या कालावधीत नोंदणी न केल्यास ते लागवडीचे क्षेत्र पड दिसणार असून त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असल्याने नोंदणी करण्याचे आवाहन मडुरा तलाठी विजय कविटकर…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कमचाऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन

*⚡बांदा दि.२३-:* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्यांवर चर्चा करून दिलेल्या ठोस आश्वासनाची कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कार्यालयाचे फसवे व वेळकाढू धोरणामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत तिव्र संताप निर्माण झाला असून न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी उद्या 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक…

Read More

मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे ट्रकला अपघात

सावंतवाडी-:मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला असून, आज सकाळी साडे सातच्या सुमारास हा अपघात घडला आहे. परंतु, सुदैवाने या अपघातात कोणीही जख्मी झाले नाही. या अपघाताबाबतची माहिती वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांनी दिली आहे.

Read More

पत्रादेवी तपासणी नाक्यावर बारा लाखांच्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

*⚡बांदा ता.२३-:* गोव्यातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना गोवा अबकारी खात्याने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीच्या दारुसह एकूण २९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ८ वाजता करण्यात आली. याबाबत…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 423.7950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.73 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 87.9500, अरुणा – 78.9433, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

देवगड तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 34.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3765.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 21(3669), सावंतवाडी –…

Read More
You cannot copy content of this page