सरंबळ येथील अनधिकृत वाळू उसपा करणाऱ्या होडीला आग लावून केले नष्ट

कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व पथकाची कामगिरी : अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये घबराट

*💫कुडाळ दि.१५-:* कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व त्यांच्या पथकाने सरंबळ येथे अनधिकृत वाळू उसपा करणाऱ्या होडीला आग लावून होडी नष्ट केली, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. तहसीलदार यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उसपा अनधिकृतरित्या सुरु आहे की नाही हे तपासणी करीता सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तहसिलदार अमोल फाटक व महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी असे महसुल विभागाचे पथक सरबंळ येथील कर्ली नदीपात्रालगत गेले होते. या दौऱ्यादरम्यान येथील कर्ली नदीकिनारी एका होडीत मोठ्या प्रमाणात वाळु भरलेली त्यांना दिसून आली. ही होडी कोणाची आहे याची त्यांनी चौकशी केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. या होडीमध्ये अनधिकृत वाळू साठा होता. त्यामुळे अनधिकृत वाळू उसपा करणाऱ्या या होडीला आग लावून त्यांनी ती होडी नष्ट करून टाकली, अशी माहिती महसूल विभागातून देण्यात आली. या बाबत तहसीलदार अमोल फाटक यांना विचारले असता त्यांनीही या होडीतून अनधिकृतरीत्या वाळू उसपा केला जात होता, म्हणून ती होडी नष्ट करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.

You cannot copy content of this page