Headlines

तालुक्यात भात पीक कापणीला सुरुवात

तहसीलदार रामदास झळके यांनी सहकाऱ्यांसह शेत मळ्यात उतरत केली भात कापणी वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यात भात पीक कापणीला नुकतीच सुरू सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार रामदास झळके स्वतः शेताच्या मळ्यात उतरत सहकाऱ्यांसमवेत भुईबावडा येथे भात कापणी केली. भात कापणी प्रयोग कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. शासकीय कामकाजात नेहमी व्यस्त असलेल्या तहसीलदार यांनी हातात खुरपे…

Read More

लायन्स क्लब कडून सेवा दिनानिमित्त रुग्णालयात फळे वाटप

सावंतवाडी ता.-:जागतिक सेवा दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने आज भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल , राणी जानकीबाई सुतिका गृह येथील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले आहे. यावेळी लायन्स अध्यक्ष अँड. परिमल नाईक व संस्था अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य पाटील, ला. झेड. सी….

Read More

एव्हिएशन लीडर इंडियनऑइल कडून सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या उड्डानासाठी इंधन पुरवठा

*⚡सिंधुदुर्ग दि.९-:* महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इंडियनऑइल एव्हिएशन कडून आज सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरच्या पहिल्या उड्डाणाला इंधन पुरविण्यात आले. भारत सरकार ने UDAAN या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला (प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना) आरसीएस विमानतळ म्हणून अधिसूचित केले आहे. आरसीएस विमानतळ असल्याने या विमानतळावर इंधन भरण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी भारत सरकार तर्फे इंडियनऑइलला वाटप करण्यात…

Read More

ज्येष्ठ नागरीक संघाची सभा १६ रोजी

*⚡वेंगुर्ला ता.०९-:* ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्लाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ः३० वाजता (कोरम अभावी १० वाजता) साई मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस संघाच्या सर्व सदस्यांनी वेळीच उपस्थित राहावे. असे आवाहन संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी, उपाध्यक्ष एस. एस. काळे व कार्यवाह जगदीश तिरपुडे यांनी केले आहे.

Read More

चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळयाचे कणकवलीत याची देही याची डोळा दर्शन

ढोल-ताशांच्या गजरात शिवसेनेने आनंदोत्सव केला साजरा *⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेनेच्यावतीने कणकवली शहरातील आप्पासाहेब पर्टवर्धन चौकात स्क्रीन लावून या ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले होते. हे प्रेक्षपण नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावून पाहिले.या सोहळ्यानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तर अनेकांनी हा ऑनलाइन सोहळा पाहून या क्षणाचा आनंद घेतला. चिपी-परुळे येथे…

Read More

भाजप मंत्री पुत्राला त्वरीत अटक न झाल्यास काँग्रेसतर्फे जिल्ह्यात आंदोलन

इर्शाद शेख यांची माहिती *⚡वेंगुर्ला ता.०९-:* शेतक-यांच्या काँग्रेस प्रेमाबद्दल भाजपला टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशात कुळ कायदा लागू करुन ‘कसेल त्याची जमीन‘ या न्यायाने देशातील गरीब शेतमजूरांना शेतजमिनीचे मालक बनविले त्या काँग्रेस पक्षाच्या शेतकरी प्रमावर टिका करणे ही भाजपच्या नेत्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. शेतक-यांना गाडीखाली चिरडून मारणा-या मंत्री पुत्राच्या कथीत कृत्याविषयी…

Read More

देवगड तालुक्यातील अनेक शिवसैनिकांचा भाजप प्रवेश

*⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळ शुभारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. असे असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार नितेश राणे यांनी अनोखे स्वागत केले आहे. देवगड तालुक्यातील पुरळ हुर्षी गावातील अनेक शिवसैनिकांनी भाजप प्रवेश केला आहे. कणकवली देवगड मतदार संघाचा विकास हा राणे आणि भाजपच करू शकतात. असा विश्वास व्यक्त करत शिवसैनिकांनी…

Read More

चिपी विमानतळामुळे कोकणचा विकास होईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्गार; चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा *⚡सिंधुदुर्ग दि.०९-:* चीपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणचा विकास होणार असून, चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील म्हणाले आहेत. हे विमानतळ होण्यासाठी सर्वच पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी योगदान दिले असून, या…

Read More

सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला प्रारंभ

विमानतळ उदघाटन प्रसंगी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास *⚡सिंधुदुर्ग दि.०९-:* महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तसंच हे केवळ चिपी विमानतळाचं उद्घाटन नाही तर सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला सुरुवात असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय.

Read More

आता आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी प्रयत्न

सिंधुदुर्ग एअरपोर्ट उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन *⚡सिंधुदुर्ग दि.०९-:* कोकण वासियांसाठी आजचा क्षण आनंदाचा असून, या विमानतळामुळे कोकणचा विकास होणार असून, चीपि विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण वासियांना दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, याच विमानतळावर हेलीपोर्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याला…

Read More
You cannot copy content of this page